मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाच्या नामकरणाबाबत मोठा वाद निर्माण झालेला असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सूचनेनुसार या वसतिगृहाला स्वातंत्र्यावीर सावरकरांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाबाबत छात्रभारतीने या संघटनेने निर्णयाचा विरोध केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून या नामकरणाला विरोध झाला आहे. छत्रपती शाहू महाराज यांचे शैक्षणिक योगदान पाहता मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय वसतीगृहाला छत्रपती शाहू महाराज यांचे नाव देण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कोली जात होती.
छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे राज्यकारध्यक्ष रोहित ढाले यांच्या नेतृत्वात आज मुंबई विद्यापीठाच्या कलिना आवारात आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला मुंबई विद्यापीठाने विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याला याआधीच विरोध केला होता.
२८ जुलै रोजी व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली, त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाला मंजूरी देण्यात आली. या वादात युवा सेनेने तटस्थ भूमिका घेतली, त्यांच्याकडून सावरकर आणि शाहू महाराज हे दोघेही आमच्यासाठी आदरणीय असल्याचे त्यांनी सांगितले. तर अभविपच्या मागणीला यश आले आहे.
१४६ विद्यार्थ्यांची क्षमता असलेले हे वसतिगृह सहा मजल्यांचे आहे. पश्चिम मुंबईतील सांताक्रूझ येथील कलिना कॅम्पसमध्ये हे वसतिगृह बांधण्यात आले आहे. ८ जुलै २०२२ रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले होते.