संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 16 August 2022

मुकेश अंबानीसह कुटुंबाला सुरक्षा कायम ठेवण्याचे कोर्टाचे आदेश

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली : मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला दिल्या जाणाऱ्या सुरक्षेवरुन विकास साहा यांनी त्रिपुरा हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. यावर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष व उद्योगपती मुकेश अंबानी आणि कुटुंबाला सुरक्षा कायम ठेवण्याची परवानगी आज सुप्रीम कोर्टानं केंद्राला दिली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेला असलेला धोका लक्षात घेता झेड+सुरक्षा देण्यात आली होती. त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना व्हाय+ सुरक्षा देण्यात आली आहे.

मिळालेल्या महतीनुसार, मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना गृह मंत्रालयाकडून देण्यात येणाऱ्या सुरक्षाविरोधात त्रिपुरा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.त्रिपुरा कोर्टानं ही याचिका स्वीकारत केंद्र सरकारला नोटीस पाठवली होती. तसेच या सुरक्षेचा तपशील मागवला होता. त्याचबरोबर सुनावणीदरम्यान गृहमंत्रालयातील अधिकाऱ्याला हजर राहण्याचे आदेश त्रिपुरा कोर्टाकडून देण्यात आले होते. केंद्र सरकारने याबाबत सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाकडून अशाप्रकराची याचिका याआधी रद्द करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणाचा त्रिपुराशी कोणताही संबंध नाही. तसेच एखाद्या कुटुंबाला दिल्या जाणाऱ्या सुरक्षेचा विरोध, हा विषय जनहित याचिकेचा असू शकत नाही. तसेच याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्याचा ठावठिकाण्यावरही गृहमंत्रालयाचे संशय व्यक्त करत जनहित याचिका करणाऱ्याचा या प्रकऱणाशी कोणताही संबध नसल्याचा केंद्राने सुप्रीम कोर्टात सांगितले. याबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. मुख्य न्यायाधीश एन व्ही रमण्णा, न्यायाधीश कृष्ण मुरारी आणि न्यायाधीश हेमा कोहली यांच्या खंडपीठाने याबाबत आज निर्णाय दिला. या प्रकरणाचा त्रिपुरा हाय कोर्टाशी कोणताही संबंध नाही. हे प्रकरण मुंबई हायकोर्ट, केंद्र सरकार आणि मुकेश अंबानी यांच्यातील आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami