संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 15 August 2022

मुख्यमंत्र्यांच्या अग्रदूत बंगल्यात बत्ती गुल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अग्रदूत बंगल्याची वीज गेल्याने सध्या तात्पुरत्या स्वरुपात वीजजोडणी करण्यात आली आहे. बेस्टची केबल जळाल्याने हा विजेच्या कामांचा फटका मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याला बसला आहे. त्यामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर काम सुरु आहे. त्यासाठी बंगल्यासमोरच ५ फूटांचा खड्डा खोदण्यात आला आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी आणखीन दोन ते तीन दिवस लागणार आहेत . बेस्ट ही महानगरपालिकेच्या अखत्यारित असून महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता होती.

शिवसेनेतून बंडखोरी करीत मुख्यमंत्री बनलेले एकनाथ शिंदे अजून वर्षा या शासकीय निवासस्थानी राहण्यासाठी गेलेले नाहीत. ते त्यांच्या नंदनवन, तसेच अग्रदूत या शासकीय बंगल्यावरूनच मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार चालवत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागच्या सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना त्यांना अग्रदूत हा शासकीय बंगला मिळाला होता. आताही सध्या हा बंगला मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात आहे.या बंगल्यांना बेस्ट उपक्रमाकडून वीजपुरवठा होतो. विशेष म्हणजे बेस्ट उपक्रम हा मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येतो. थेट मुख्यमंत्र्यांच्याच घराची बत्ती गुल झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami