संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 09 August 2022

मुधोळ सहकारी बँकेचा परवाना रद्द ! आरबीआय ची कारवाई

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने कर्नाटकातील एका बँकेवर मोठी कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँकेने बागलकोट, कर्नाटकातील मुधोळ सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला आहे. हा आदेश ८ जून पासून लागू करण्यात आला आहे. या कारवाईनंतर खातेदार पैसे काढू आणि जमा करू शकणार नाहीत.

दरम्यान, रिझर्व्ह बँकेने मुधोळ को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा परवाना रद्द करण्यामागे बँकेकडे पुरेसे पैसे नसल्याचे कारण दिले आहे. त्यामुळे बँकेचे उत्पन्न जवळपास संपले आहे. अशा परिस्थितीत बँकेची आर्थिक स्थिती पाहता आरबीआयने बँकेचा परवाना रद्द केला आहे. त्यामुळे आता ज्या ग्राहकांच्या खात्यात पैसे पडले आहेत त्यांना ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकते. यापेक्षा जास्त रक्कम मिळणार नाही. डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन अंतर्गत ग्राहकांच्या बँक खात्यात जमा केलेल्या पैशांवर बीना सुविधा देण्याचे काम केले जाते. डीआयसीजीसी अंतर्गत, ग्राहकांना विविध प्रकारच्या योजनांचे लाभ मिळतात. यामध्ये तुम्हाला बचत खाते, एफडी योजना, चालू खाते इत्यादी योजनांवर विम्याची सुविधा मिळेल. या विमा योजनेचे फायदे ही विमा सुविधा व्यापारी बँकांमध्ये तसेच राज्य आणि केंद्र सरकारच्या बँकांमध्ये उपलब्ध आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami