संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 12 August 2022

मुर्मू यांची शिंदे गट -भाजपाशी भेट! उद्धव ठाकरेंना न भेटताच परतल्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू प्रचारासाठी आज दुपारी मुंबईत दाखल झाल्या . छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपाचे नेते त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. विमानतळाजवळील हॉटेल लीला येथे त्यांनी भाजप तसेच शिंदे गटातील आमदार-खासदारांना संबोधित केले.राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आपल्याला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळीस केले. मात्र मुंबईच्या एकदिवसीय दौर्यात त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली नाही.

मुर्मू यांच्या दौऱ्याच्या सुरुवातीला हॉटेल लीला येथे पालघर येथील आदिवासी बांधवांकडून पारंपारिक आदिवासी नृत्य सादर करत त्यांचे स्वागत करण्यात आले. .यावेळी आदिवासी समाजाची सांस्कृतीक प्रतिकं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वस्तू यावेळी मुर्मू यांना भेट देण्यात आली. यावेळी भाजपचे नेते, आमदार आणि खासदार यावेळी उपस्थितीत होते. मुर्मू या राष्ट्रपतीपदासाठी ईंडीए च्या उमेदवार आहेत, त्यांची विशेष ओळख म्हणजे त्या आदिवासी समाजातील पहिल्या महिला आहेत ज्यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना पाठींबा जाहीर केला होता. त्यामुळे त्या ठाकरे यांची आज भेट घेतील अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र उद्धव ठाकरे यांना न भेटताच त्या परत गेल्या. राष्ट्रपतीपदाची निवडणूक येत्या १८ तारखेला होणार आहे. कॉंग्रेसकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. द्रौपदी मुर्मू या ओरिसातील आदिवासी नेत्या आहेत.तसेच यापूर्वी त्यांनी झारखंडच्या राज्यपाल म्हणून देखील जबाबदारी पार पाडली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami