मुंबई- 5 जूननंतर एमएमआरडीए मुंबई मेट्रोमधून महाराष्ट्र सुरक्षा बलाची सुरक्षा काढण्याची शक्यता असून त्याजागी आता खाजगी सुरक्षा रक्षक पुरवल्या केली जाणार आहे. एमएमआरडीएने महाराष्ट्र सुरक्षा बळाला तसे पत्र दिले आहे.
संवेदनशील ठिकाणे, आस्थापने यांच्या सुरक्षेचा भार पोलिस यंत्रणेवर पडत असल्याने मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ स्थापन करून त्याअंतर्गत महाराष्ट्र सुरक्षा बलाची निर्मिती केली. त्यानुसार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महाराष्ट्र सुरक्षा बल रक्षक सुरक्षा देतात, त्यामध्ये मुंबई मेट्रोमध्ये देखील गेल्या काही वर्षापासून सुरक्षा देत होते. मात्र आता मुंबई मेट्रोमधून महाराष्ट्र सुरक्षा बलाची सुरक्षा काढण्यात येणार असून त्याजागी खाजगी सुरक्षा रक्षक पुरवल्या जाणार आहेत.