संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 16 August 2022

‘म्हैसाळ’मधून बिरनाळ तलावात वर्षातून 4 वेळा पाणी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सांगली – जिल्ह्यातील जत शहराला पाणीपुरवठा करणार्‍या बिरनाळ तलावात आता म्हैसाळ सिंचन योजनेतून वर्षांतून चार वेळा पाणी सोडले जाणार आहे. या नव्या प्रस्तावित पाणी योजनेसाठी हव्या असणार्‍या आरक्षित पाण्याला मंजुरी देण्याचा निर्णय नुकताच राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती आमदार विक्रमदादा सावंत यांनी दिली. आमदार विक्रमदादा सावंत यांनी सांगितले की, या बैठकीत तालुक्यातील 29 तलाव भरण्याचाही निर्णय घेण्यात आला. त्यामुळे तालुक्यातील गावांचा पाणीपुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या बैठकीस पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, जात पंचायत समिती गटविकास अधिकारी दिनकर खरात, जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे, राष्ट्रवादी नेते रमेश पाटील, जिल्हा बँक संचालक सरदार पाटील, माजी नगरसेवक निलेश बामणे आदि उपस्थित होते.

यावेळी आमदार सावंत पुढे म्हणाले की,जत तालुक्यातील 12 तलावांना म्हैसाळ योजनेचे पाणी जावू शकते,यातून 29 गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटू शकतो.याआधी बिरनाळ तलावात वर्षांतून 2 वेळा पाणी सोडले जा होते.मात्र आता या तलावात वर्षांतून 4 वेळा पाणी सोडले जाणार आहे.त्यामुळे जत शहराचा पिण्याचा पाणीप्रश्नही उद्भवणार नाही.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami