लखनौ – उत्तर प्रदेश विधान् परिषदेवर राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यासह १३ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. यामध्ये भाजपचे ९ आणि समाजवादी पक्ष्च्या ४ उमेदवारांचा समावेश आहे.
युपी विधान परिषदेवरील १३ सदस्यांचा कार्यकाल संपला होता. त्यामुळे या १३ रिक्त जागांसाठी २० जून रोजी निवडणूक होणार होती निवडणूक होती. या निवडणुकीसाठी भाजपचे ९ आणि समाजवादी पक्षाच्या ४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते . ११ जून रोजी या उमेदवारी अर्जांची छाननी झाली. आणि आज १३ जूनला दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती . मात्र १३ पेक्षा अधिक उमेदवार नसल्याने अखेर या १३ जणांची बिनविरोध निवड झाली .
ज्या १३ उमेदवारांची विधान् परिषदेवर बिनविरोध निवड झाली त्यामध्ये उप मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य ,भूपेंद्र चौधरी , के पी एस राठोड, दानिश आझाद अन्सारी, जसवंत सैनी ,दयाशंकर मिश्र दयाळू आणि नरेंद्र कश्यप या मंत्र्याचा समावेश आहे. तर समाजवादी पक्ष तर्फे स्वामी प्रसाद मौर्य,मुकुल यादव ,जास्मीर अन्सारी,आणि शहनवाज खान यांना संधी देण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांच्यासाठी मतदार संघ सोडणारे सोब्रान सिंह यांचे पुत्र मुकुल यादव यांना यावेळी विधान परिषदेसाठी संधी देण्यात आली.