रत्नागिरीत – रत्नागिरीत आज रविवारी सकाळपासून पुन्हा एकदा पावसाला जोरदार प्रारंभ झाला आहे. रत्नागिरीत काल शनिवार सकाळ पासून पावसाची रिपरीप सुरु हाेती. रात्रभर पावसाने धुमाकुळ घातला होता.पहाटेच्या सुमारास पावसाचा जोर ओसरला होता.परंतु काहीशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने शहरास झाेडपले आहे.
गेल्या २४ तासांत रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी १३५.७८ मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे. सर्वाधिक पाऊस हा लांजा तालुक्यात पडला आहे. लांज्यात २७५ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर सर्वात कमी पाऊस खेडमध्ये २१ मिमी पडला आहे.
रत्नागिरीत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.तर २८ जून पर्यंत पावसाचा अलर्ट जारी केला गेलाय. कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत. समुद्रातील वा-याचा वेग देखील जास्त असल्याने मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.