संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 14 August 2022

रविवारपासून मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मुंबई आणि कोकणाच्या वेगवेगळ्या परिसरात सध्या मधूनमधून पावसाचा हलक्या सरी कोसळत असताना आता मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये 19 जूनपासून मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिली. मराठवाडा आणि विर्दभात अधूनमधून मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचे देखील विभागाने सांगितले.

अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वारे कमी दाबाच्या क्षेत्रात वेगाने येत आहेत. त्यामुळे कोकणात आणि घाट भागात पावसाचा जोर अधिक राहील. राज्यभरात 18 जूनपासून मोसमी पाऊस सक्रिय होणार असून मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, मुंबईत 19 जूनपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे, उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ताशी 60 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. दक्षिण किनारपट्टीवरही अशीच स्थिती असेल. उंच लाटा आणि खवळलेल्या समुद्रामुळे मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami