संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 15 August 2022

राजस्थानात बनावट नोटांविरोधात मोठी कारवाई

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

जयपूर – राजस्थानमध्ये शनिवारी रात्री बनावट नोटांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. बिकानेर शहरातील जयनारायण व्यास कॉलनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बनावट नोटा आणि नोटा छापण्याचे मशीन जप्त केले.

सुमारे दीड कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या, असे कळते. परंतु याप्रकरणी किती आरोपींना अटक करण्यात आली आणि किती रुपयांच्या नोटा जप्त केल्या, याबाबत पोलिसांनी अद्याप खुलासा केलेला नाही. बिकानेरचे पोलीस महानिरीक्षक ओम प्रकाश यांच्या नेतृत्त्वाखाली रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. दरम्यान, बनावट नोटांवर राज्यातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचा दावा पोलीस महानिरीक्षक ओम प्रकाश यांनी केला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami