मुंबई – राज्यात आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. दैनंदिन रुग्णांची संख्या सातशेच्या पार पोहोचली आहे. काल दिवसभरात ७११ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून ३६६ रुग्ण बरे होऊन घरी परतले, तर एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७८,८७,०८६ एवढी झाली आहे, यापैकी एकूण ७७,३५,७५१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०८% एवढे झाले आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७ टक्के एवढा आहे. तर सध्या ३,४७५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, मुंबईत काल दिवसभरात ५०६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर, २१८ जणांना रुग्णालयातून डिस्चार्च मिळाला. मुंबईत आतापर्यंत एकूण १०,४३,७१० रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या २,५२६ कोरोना रुग्ण उपचार घेत आहे.