संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 17 August 2022

राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – राज्यात काहीशी उसंत घेतल्यानंतर पाऊस पुन्हा बरसणार, अशी शक्यता निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, राज्यात पुन्हा पुढचे चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यात यंदा पावसाचे आगमन उशिरा झाले असले तरी जुलैच्या १ तारखेपासून सलग १८ दिवस पाऊस कायम होता. गेल्या ५ दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता, तर दुसरीकडे शेती मशागतीच्या कामांनाही वेग आला होता. मात्र आता पुन्हा पावसाचा धोका आहे. कालपासून पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, तसेच पालघरसह नाशिक, पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. तर पूर्व मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami