पुणे – राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये येत्या ५ दिवसांत विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यातील हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसळीकर यांनी याबाबत ट्विट केले आहे. पश्चिम किनार्यावर ऑफ-शोअर ट्रफ आणि पश्चिमेकडील वाऱ्यांच्या प्रभावाखाली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
पश्चिम किनार्यावर ऑफ-शोअर ट्रफ आणि पश्चिमेकडील वाऱ्यांच्या प्रभावाखाली;
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 14, 2022
येत्या 5 दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळाची शक्यता.
– IMD
4, 5 दिवसांचे इशारे जवळपास सारखेच आहेत. pic.twitter.com/BNNHSNLKv5
दरम्यान, केरळातून कोकणात दाखल झालेल्या मान्सूनचा वेग आता मंदावल्याचे दिसत आहे. कोकणानंतर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात वेगाने पावसाला सुरुवात झाली असली तरी पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे व मराठवाड्यातील परभणी, जालना वगळता इतर जिल्ह्यांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे आता हवामान विभागाने येत्या ५ दिवसांत वादळाची शक्यता वर्तविली असल्याने पाऊस पडेल अशी आशा आहे. ४, ५ दिवसांचे इशारे जवळपास सारखेच आहेत, असे हवामान विभागाने म्हटले आहे.