राज ठाकरेंच्या नावे खंडणी मागण्याचा प्रकार, मराठी चित्रपट निर्माते – दिग्दर्शकाला अटक

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाने खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल होताच मालवणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

धक्कादायक म्हणजे अटक करण्यात आलेल्यांमध्ये सिनेसृष्टीतील तिघांचा समावेश आहे. दिग्दर्शक मिलन वर्मा, निर्माता युवराज बोऱ्हाडे आणि चालक सागर सोलनकर यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी एका मराठी अभिनेत्रीलाही नोटीस बजावल्याचे सांगितले आहे. आरोपींनी मुंबईतील मड परिसरातल्या एका बंगल्याच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली आणि याचा व्हिडिओ व्हायरल केला. व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक महिला राज ठाकरेंचं नाव घेत एका सुरक्षारक्षकाला मारहाण करत आहे. राज ठाकरेंना तू ओळखत नाहीस का? काम कोणासाठी करतोस आणि महाराष्ट्रात, मुंबईत कसा राहतोस? असे सवाल करत आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी मालवणी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनुराग दिक्षीत यांनी माहिती दिली आहे. सुरक्षारक्षकाच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून यातल्या महिलेला पोलीस ठाण्यात बोलवण्यात आलं होतं. मात्र ती रात्री आली नाही, म्हणून तिला आता पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आली आहे.

Close Bitnami banner
Bitnami