संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 09 August 2022

राणेंच्या ‘अधीश’ बंगल्याप्रकरणी
पालिकेने 2 आठवड्यांत उत्तर द्यावे

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – जुहू येथील ‘अधीश’ बंगल्यातील काही भाग बेकायदा ठरवण्यात आला असून तो नियमित करण्याच्या मागणीसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नव्याने अर्ज केला होता. हा अर्ज विचारात घेणे किती योग्य आहे, असा प्रश्‍न उच्च न्यायालयाने मंगळवारी उपस्थित केला. तसेच 25 जुलैपर्यंत त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने राणे आणि पालिकेला दिले होते. मात्र आता नारायण राणे अनधिकृत बंगलाप्रकरणी दाखल नवीन याचिकेवर मुंबई महानगरपालिकेला 2 आठवड्यांमध्ये उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
हायकोर्टाच्या निर्देशानुसार, मुंबई महानगरपालिकेला बंगल्यावर कोणतीही कारवाई करता येणार नाही. तसेच कोणत्याही प्रकारचे नवीन बांधकाम नारायण राणे यांनी बंगल्यात करू नये, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
राणे यांच्या बंगल्यातील काही भाग पालिकेने बेकायदा ठरवून तो पाडण्यास सांगितला होता. त्याला राणे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते, त्यावर गेल्याच महिन्यात निकाल देताना पालिकेचा निर्णय योग्य असल्याचे न्यायालयाने सांगितले होते. त्यानंतर राणे यांनी मुंबई महानगरपालिका कायद्यातील दुसर्‍या कलमाचा आधार घेऊन बंगल्यातील बांधकाम नियमित करण्यासाठी नव्याने पालिकेकडे अर्ज केला. मात्र उच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने त्यावर निर्णय घेण्यास नकार दिल्याने राणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami