संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 13 August 2022

‘राम सेतू” वरून वाद ! अक्षय कुमारलाअटक करून देशाबाहेर हाकलून लावा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

चेन्नई – बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटाला आता कायदेशीर लढाईला सामोरे जावे लागणार आहे. अक्षय कुमारवर गुन्हा दाखल होणार असल्याची बातमी समोर येत आहे. भाजप नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी नुकसान भरपाईची मागणी करत गुन्हा दाखल करणार आहेत. चित्रपटात ‘राम सेतू’चा मुद्दा चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. खुद्द सुब्रमण्यम स्वामी यांनीच खटला दाखल केल्याची माहिती दिली आहे.अक्षय कुमार याला अटक करून देशाबाहेर हाकलून लावा अशी खळबळजनक मागणीही स्वामी यांनी केली आहे.

भाजप नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.चित्रपटात राम सेतूचा मुद्दा चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याचा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.तथ्यांशी छेडछाड केल्याचा त्यांचा दावा आहे. आपल्या ट्विटमध्ये सुब्रमण्यम स्वामींनी लिहिले, ‘माझे सहकारी अधिवक्ता सत्य सब्रवाल यांनी भरपाईचे प्रकरण अंतिम केले आहे. मी अभिनेता अक्षय कुमार आणि कर्मा मीडिया यांच्याविरोधात त्यांच्या चित्रपटातील राम सेतू प्रकरणाच्या चुकीच्या चित्रणामुळे झालेल्या नुकसानीसाठी दावा दाखल करत आहे.’ सुब्रमण्यम स्वामी यांनी आणखी एक ट्विट करत लिहिले, ‘जर अक्षय कुमार परदेशी नागरिक असेल तर आम्ही त्याला अटक करून त्याच्या दत्तक देशातून बाहेर काढण्यास सांगू शकतो.’
एप्रिल महिन्यात राम सेतू चित्रपटाचे पोस्टर व्हायरल झाले होते. अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्रामवर चित्रपटाचा पोस्टर शेअर केला होता.या पोस्टरमध्ये अक्षय कुमारसोबत जॅकलिन आणि सत्यदेव दिसत आहेत. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये हे तिन्ही कलाकार एका ऐतिहासिक ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हे तिघे एका गुहेच्या आत दिसतात, ज्याच्या भिंतीवर एक विचित्र खूण आहे.

दरम्यान,अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट यावर्षीच्या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे शूटिंगही पूर्ण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित केली आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादात सापडला आहे. अक्षय कुमारचा आगामी ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ११ ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami