नवी दिल्ली- बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेला आता काही तासच शिल्लक राहिले असताना ऑलेंपिक मध्ये भालाफेकीत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा भारताचा स्टार ऍथलेटिक नीरज चोप्रा याने दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेतली आहे. नीरज चोप्रा राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर गेल्याने भारताचे हमखास अपेक्षित असलेले एक पदक कमी होणार आहे.नीरजच्या माघारीमुळे भारताला मोठा धक्का बसला आहे . .
वर्ल्ड अथेलेटिक्स चॅंपियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत नीरज चोप्राला दुखापत झाली होती. मात्र त्याही परिस्थितीत त्याने भारताला रजत पदक मिळवून दिलेले होते. पण त्यानंतर त्याची हि दुखापत बळावली होती.त्याला ग्रोईंन इंजरी होती आणि वैद्यकीय चाचणी नंतर त्याला डॉक्टरांनी १ महिना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. म्हणूनच त्याने राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेतली आहे. अशी माहिती भारतीय ऑलंपिक महासंघाचे सचिव राजीव मेहता यांनी दिली.त्यामुळे आता भालाफेकीत भारताला पदक मिळवून देण्याची जबाबदारी डी.पी.मन्नू आणि रोहित यादव यांच्यावर आहे. नीरज चोप्रा ५ ऑगस्ट रोजी या स्पर्धेत खेळणार होता. तसेच राष्ट्रकुल स्पर्धेच्या उदघाटन समारंभात तो भारताचा ध्वजवाहक होता . पण आता त्याच्या जागी दुसरा खेळाडू भारताचा ध्वजवाहक असेल . मात्र तो कोण असेल याबाबतचा अजून निर्णय झालेला नाही.
राष्ट्रकुल स्पर्धा २८ जुलै पासून सुरु होणार आहे आणि या स्पर्धेसाठी भारताने २१५ खेळाडूंचे पथक पाठवले आहे. यात काही ठराविकच स्पर्धकांकडून पदकाच्या आशा आहेत. जर नीरज या स्पर्धेत असता तर त्याने निश्चितच पदक मिळवून दिले असते