मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांचे निवासस्थानावर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. मुंबईतील वरळी परिसरातील सीजे हाऊस इमारतीमधील चौथ्या मजल्यावर असलेले घर ईडीने जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. गँगस्टर इकबाल मिरची प्रकरणात ईडीने ही कारवाई केल्याचे समजते. याच इमारतीमधील दुसर्या मजल्यावर असलेली पटेल यांची मालमत्ता ईडीने यापूर्वीच जप्त केली आहे.
प्रफुल्ल पटेल यांची ईडीकडून याआधी दोनवेळा चौकशी झाली होती. चौकशीनंतर ईडीने जो तपास केला त्यानंतर पटेल यांच्याविरोधात आज मोठी कारवाई करण्यात आली. प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातो. सध्या ते राज्यसभेवर खासदार आहेत. युपीएचे सरकार सत्तेत होते तेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात ते विमानोड्डाण मंत्रीही होते. ईडीचा असा आरोप आहे की, वरळी येथील सीजे हाऊस ही एक मोठी इमारत आहे. याच इमारतीच्या बांधकामाआधी तिथे एक छोटी इमारत होती.