संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 17 August 2022

राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई -शिंदे गटाच्या बंडखोरांनी आघाडी सरकार पाडले . त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सध्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरीझाडात आहेत. असे असताना राष्ट्रवादीचे नेते आणि माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मात्र मुख्यमंत्र्यांचे तोंड भरून कौतुक केले आहे. त्यामुळे आघाडीचे नेते आश्रय व्यक्त करीत आहेत.

कागल मधील श्रमिक वसाहतीतील मिळकतधारकांना प्रॉपर्टीकार्ड देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी केलेल्या भाषणात हसन मुश्रीफ म्हणाले कि एकनाथ शिंदे पूर्वी महाविकास आघाडी सरकारमध्ये काम करीत असताना त्यांनी कागल बरोबरच गडहिंग्लज मुरगूड शहराच्या आज जरी ते विकासासाठी मी जेवढा निधी मागितला होता तेवढा निधी दिला . आज जरी ते आमच्या विरोधी सरकारचे मुख्यमंत्री असले तरी त्यांनी कागलला कोट्यवधींचा विकास निधी दिलेला आहे. म्हणूनच मी त्यांच्या कामाचे कौतुक करून त्यांचे जाहीर आभार मानतो असे मुश्रीफ यांनी आपल्या भाषणात सांगितले . मुश्रीफ यांनी अशातर्हेने जाहीरपणे मुख्यमंत्र्यांचे आभार मानल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसम तसेच महाविकास आघाडीतील इतर पक्षांमध्येही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami