दिल्ली- भारतीय मनोरंजन क्षेत्रातील प्रतिष्ठित राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. यंदाचा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा पुरस्कार गायक राहुल देशपांडे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.’गोष्ट एका पैठणीची’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘अवांचित’ आणि ‘गोदाकाठ’ या दोन मराठी सिनेमांसाठी किशोर कदम यांना विशेष ज्युरीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटचा पुरस्कार विवेक दुबे यांच्या फनरल ला जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार टकाटक या चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या अनिश गोसावीला जाहीर झाला आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अजय देवगणला तान्हाजी: द अनसंग वॉरियर या चित्रपटासाठी तर अभिनेता सूर्याला सूरराय पोट्रूसाठी जाहीर झाला आहे. 1232 किलोमीटर मरेंगे तो वहीं जाकर साठी विशाल भारद्वाज यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर झाला. सामाजिक समस्यांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जस्टिस डिलेड बट डिलिव्हर्ड आणि थ्री सिस्टर्स यांना घोषित करण्यात आला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार अपर्णा बालमुरली यांना सूरराय पोट्रूसाठी आणि सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार सायनासाठी मनोज मुंतशीर यांना जाहीर करण्यात आला.
यंदाच्या ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली गेली आहे.या पुरस्कारांसाठी दरवर्षी हिंदीसह,मराठी, कन्नड, मणिपुरी, पंजाबी, तमिळ, तेलुगू, छत्तीसगढ़ी, हरियाणवी या भाषांसह इतर प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांना नामांकन दिली जातात.चित्रपट, साहित्य आणि कला क्षेत्रात सर्वोत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना भारत सरकारकडून हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात.या पुरस्कारांची सुरुवात १९५४ साली करण्यात आली होती.