संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 12 August 2022

राहुल गांधींची चौकशी तात्पुरती स्थगित; आता सोमवारी हजर राहावे लागणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – कॉंग्रसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ईडीने तीन दिवसांची मुदत दिली आहे. कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नसल्याने राहुल गांधी यांनी चौकशीसाठी तीन दिवसांची मुदतवाढ मागितली होती. ती ईडीने मान्य केली आहे. याआधी सोमवार ते बुधवार सलग तीन दिवस त्यांची चौकशी करण्यात आली होती. आता सोमवारी त्यांची चौकशी होणार आहे.

नॅशनल हेराल्डप्रकरणी ईडीने शुक्रवारी चौथ्यांदा राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांच्या प्रकृतीचे कारण देत तीन दिवस मुदतवाढ मागितली. यापूर्वी सोमवार ते बुधवार सलग तीन दिवस त्यांची चौकशी करण्यात आली होती. एजन्सीने त्यांना गुरुवारीही येण्यास सांगितले होते, मात्र त्यांनी एक दिवसाचा ब्रेक घेतला. याआधीही त्यांनी सोनिया गांधींना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यासोबत वेळ घालवल्याच्या कारणावरून एक दिवसाची सुट्टी घेतली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, तीन दिवसांच्या चौकशीदरम्यान राहुल गांधींच्या वक्तव्याचे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले. त्यांची विधाने कागदावर टाईप केली जात आहेत आणि मिनिट-मिनिटाच्या आधारावर दाखवली जातात आणि त्यावर स्वाक्षरी केली जाते आणि नंतर चौकशी अधिकाऱ्याकडे सोपवली जाते.

राहुल गांधी यांची सलग तीन दिवस चौकशी करण्यात आल्याने राजकीय खळबळही उडाली आहे. तीनही दिवशी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर आणि काँग्रेस कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले. मोदी सरकार राजकीय सूडबुद्धीने कारवाई करत असून त्यामुळेच गांधी कुटुंबावर हल्ला होत असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami