संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 18 August 2022

राहुल शेवाळेंवर बलात्काराचा आरोप! महिलेचे थेट मुख्यमंत्र्यानाच पत्र

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : खासदार राहुल शेवाळे यांना एकीकडे केंद्रामध्ये मंत्रीपद मिळण्याची शक्यता असताना दुसरीकडे मात्र त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.काही महिन्यांपूर्वी एका महिलेने राहुल शेवाळे यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. शेवाळे यांच्यावर पोलिस गुन्हा दाखल करत नसल्याने पीडित महिलेने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. याशिवाय हे लिहिलेले पत्र महिलेने सोशल मिडियावर प्रसिद्ध केले असून सोबत राहुल शेवाळे तिच्या वाढदिवसाला उपस्थित असल्याचा एक व्हिडिओही पोस्ट केला आहे.

शेवाळे यांनी आपल्यावर बलात्कार करत, मानसिक त्रास दिल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे. शेवाळे यांनी २०२०पासून लग्नाचे आमिष दाखवून त्यांनी आपल्यावर अत्याचार केल्याचेही महिलेने तक्रारीत लिहिले आहे. शेवाळे यांचे लग्न झाले असल्याची कल्पना होती. मात्र शेवाळे यांनी पत्नीसोबत वाद होत असून लवकरच तिच्यापासून घटस्फोट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यावर आपण विश्वास ठेवला, असेही या महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.पोलिसांनी तक्रार न घेतल्यास आपल्याकडे आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांशी याबाबत संपर्क केला असता, या प्रकरणाची कुठलीही तक्रार अद्याप आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी शेवाळे यांनी न्यायालयाच्या तक्रारीच्या आधारावर साकीनाका पोलिस ठाण्यात महिलेविरोधात खंडणी व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami