सार – पावसामुळे उत्तराखंड येथील अनेक भागांत भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. राज्यात डोंगरापासून मैदानापर्यंत पावसाचा कहर सुरू असून नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. रस्त्यावर मातीचा ढिगारा आणि खड्डे पडल्याने अनेक गावांचा संपर्क बंद झाला आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच रुद्रप्रयागमध्ये काल जोरदार पावसामुळे भूस्खलन झाले. भुस्खलनामुळे बद्रिनाथ-ऋषिकेश राष्ट्रीय महामार्गावरील डोेंगराचा काही भाग कोसळला. त्यामुळे हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
रुद्रप्रयागमध्ये अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे डोंगरांना तडे जात आहेत. बद्रीनाथ-ऋषिकेश महामार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सिरोबगड येथील महामार्गही बंद आहे. काल रात्रीही मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले. त्यामुळे बद्रीनाथ-ऋषिकेश महामार्गावर रुद्रप्रयागपासून १० किमी अंतरावर सम्राट हॉटेलजवळील टेकडीवरून मोठ्या प्रमाणात दगड आणि मलबा आला. त्यामुळे खबरदारी म्हणून महामार्ग बंद करण्यात आला होता. याचा नाहक त्रास प्रवाशांना करावा लागला.