संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 13 August 2022

रुपयाची विक्रमी घसरण; किंमत ८० रुपये प्रति डॉलर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – भारतीय रुपया सध्या अत्यंत वाईट स्थितीत आहे. गेल्या काही दिवसांपासून रुपयाचे मूल्य कमालीचे घसरले आहे. रुपया सातत्याने निच्चांकी स्तर गाठत असून आज प्रथमच तो ८० रुपये प्रति डॉलर घसरला. रुपया काल ७९.९७ वर बंद झाला होता, जो आज सकाळी ७९.९८ प्रति डॉलर मूल्याने उघडला. त्यानंतर काही वेळातच रुपया ८०.०१७५ च्या निच्चांकी पातळीवर पोहोचला. या घसरणीमुळे व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड नैराश्य आहे.

आज सुरुवातीच्या व्यवहारात रुपया ८०.०५ रुपये प्रति डॉलरच्या पातळीवर पोहोचला होता, त्यानंतर सकाळी ९.५६ वाजता डॉलरच्या तुलनेत रुपया ११ पैशांनी वाढून ७९.९४ रुपयांवर पोहोचला. खरंतर मागील मंगळवारीही रुपयावर अमेरिकन डॉलरचा दबाव होता. गेल्या मंगळवारी १२ जुलै २०२२ रोजी रुपया डॉलरच्या तुलनेत ७९.५८ निच्चांकी स्तरावर घसरला होता, तर त्यापूर्वी ५ जुलै २०२२ रोजी रुपया ७९.३८ प्रति डॉलर इतका घसरला होता.

रुपयाच्या घसरणीवरून विरोधकांनी मोदी सरकारला घेरले असून सोमवारी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारला धारेवर धरले होते. परंतु सरकारकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. दरम्यान, या वर्षात रुपया ७ टक्क्यांनी कमकूवत झाला असून तो अजूनही घसरू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami