नवी दिल्ली – देशातील मोठ्या सरकारी उपक्रमांचे खासगीकरण करण्याच्या प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून उत्तर प्रदेशातील 9 रेल्वे स्थानकांवर आजपासून खासगी कंपन्यांचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
प्रवाशांना अधिक चांगल्या सेवासुविधा देण्याच्या नावाखाली रेल्वे मंत्रालयाने उत्तर प्रदेशातील 9 रेल्वे स्थानकांमध्ये आजपासून खासगी कर्मचारी तैनात करायला सुरुवात झाली आहे. आणि त्याची सुरुवात लखनौ झोनपासून सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात गोरखपूर आणि लखनौ या दोन रेल्वे स्थानकांसह बादशहा नगर, इशबाग, सीतापूर, मानकापूर, बस्ती, खालिलाबाद, गोंडा या 9 रेल्वे स्थानकांमध्ये खासगी कर्मचारी, कोच गायडेड, क्लोक कोच, अनाऊन्समेन्ट सिस्टीम डिस्प्ले बोर्ड आदींबाबत मार्गदर्शन करण्याचे काम करतील.
तसेच सध्या हा प्रयोग केवळ उत्तर प्रदेशातील रेल्वे स्थानकांमध्येच केला जात आहे. पण ही सुरुवात आहे. भविष्यात देशातील सर्व रेल्वे स्थानकांमध्ये अशा प्रकारे खासगी कर्मचारी तैनात करण्याचा रेल्वेचा प्रयत्न असेल. मात्र हा प्रयत्न म्हणजे एक प्रकारची खासगीकरणाची चाहूलच आहे, असे रेल्वेच्या काही कर्मचार्यांनी म्हटले आहे. त्यामुळे या योजनेला देशभर विरोध होण्याची शक्यता आहे.