संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 15 August 2022

लंच ब्रेकसाठी बँका ग्राहकांना ताटकळत ठेऊ शकत नाहीत – आरबीआय

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – जेवणाच्या सुट्टीच्या नावाखाली कोणतीही बँक ग्राहकांना ताटकळत ठेवू शकत नाही, असे स्पष्टीकरण भारतीय रिझर्व्ह बँकेने माहितीच्या अधिकारात मागितलेल्या उत्तरात दिले आहे.

बँकेतील कर्मचारी आणि अधिकारी एकाचवेळी जेवणासाठी सुट्टी घेऊ शकत नाहीत. सोयीनुसार, एक-एकजण जेवणाची सुट्टी घेऊ शकतो. बँकेचे कामकाज आणि व्यवहार सुरळीत राहिले पाहिजे. लंच ब्रेकच्या नावाखाली ग्राहकांना दीड-दोन तास ताटकळत ठेवणे ही अतिशय गंभीर बाब आहे. असा प्रकार घडत असेल तर त्याबाबत बँकेतील तक्रार पुस्तिकेत तक्रार नोंदवता येते. त्याची दखल घेतली जात नसेल तर व्यवस्थापक आणि नोडल अधिकारी यांच्याकडेही तक्रार करता येते. याशिवाय प्रत्येक बँकेत तक्रार निवारण मंच असतो. या मंचचा फोन नंबर आणि ई-मेल आयडी तुम्ही बँकेकडून मिळवू शकता. बँकेच्या कस्टमर केअर क्रमांकावर कॉल करून नंबर मिळवता येतो. बँकेने महिनाभरात तक्रारीची दखल घेतली नाही, तर लोकपालाकडे अपील करता येते, असेही आरबीआयने म्हटले आहे. बँकेने चेक जमा करण्यास विलंब केल्यास बँकेला ग्राहकांना भरपाई द्यावी लागते. देशातील कुठल्याही बँकेत फाटक्या व जुन्या नोटा बदलून घेता येतात. त्यास्तही कोणतीही बँक तुम्हाला नकार देऊ शकत नाही, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami