संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 23 May 2022

‘लागीरं झालं जी’मधील अभिनेत्याचे रोटी घाटातील अपघातात निधन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
Print

बारामती – झी मराठी वाहिनीवरील ‘लागीरं झालं जी’ या मालिकेतील लोकप्रिय अभिनेते डॉ. ज्ञानेश माने यांच्या वाहनाला मकर संक्रांतीच्या दिवशी पाटस ते बारामती मार्गावरील रोटी घाटातून प्रवास करत असताना भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती. अपघातानंतर ते बेशुद्धावस्थेत होते. त्यानंतर त्यांना पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र १४ जानेवारी रोजी सकाळीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने बारामतीतील उत्कृष्ट आणि हरहुन्नरी कलाकार हरपल्याची खंत व्यक्त केली जात आहे. ज्ञानेश माने हे पेशाने डॉक्टर होते. बारामतीतील झारगडवाडी या गावचे ते सुपुत्र होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन भाऊ, भावजया आणि पुतणे असा परिवार आहे

‘लागीरं झालं जी’ ही मालिका खूपच लोकप्रिय झाली होती. या मालिकेत अभिनेते डॉ. ज्ञानेश माने एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते. निरपराध, भक्तांचा पाठीराखा, सोलापूर गॅंगवार, काळूबाईच्या नावानं चांगभलं, आंबूज, हंबरडा, यदया, पळशीची पी टी अशा अनेक चित्रपट आणि मालिकांमधून त्यांनी महत्त्वाच्या भूमिका बजावल्या होत्या. त्यांच्या अभिनयातील कारकीर्दीमुळे कलाक्षेत्रात बारामती आणि पर्यायाने झारगडवाडी या गावाचे नाव त्यांनी उंचावले होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. दरम्यान, अभिनयाची कारकीर्द गाजवत असताना त्यांनी डॉक्टरकीची सेवादेखील केली होती. ही तारेवरची कसरत करत असताना कलासृष्टीत त्यांनी स्वतःची ओळख बनवली होती. कामाप्रती त्यांची निष्ठा होती म्हणूनच सोलापूर गॅंगवार या चित्रपटात काम करत असताना त्यांच्या आईच्या निधनाची वार्ता त्यांना समजली आणि त्याच दिवशी गावी जाऊन आईला अखेरचा निरोप देऊन ते पुन्हा शूटिंगला दाखल झाले होते. आपल्यामुळे निर्मात्यांचे नुकसान होऊ नये हीच त्यांची यामागची भावना होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami