संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 16 August 2022

लालू प्रसाद यादवांचे निकटवर्तीय भोला यादव सीबीआयच्या अटकेत

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – नोकरी घोटाळ्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांचे तत्कालीन ओएसडी भोला यादव यांना सीबीआयने आज सकाळी दिल्लीतून ताब्यात घेत अटक केली. यासंदर्भात भोला यादव यांच्या पाटणा आणि दरभंगा येथील ठिकाणांवर सीबीआयकडून तपास सुरु होता. या तपासानंतरच सीबीआयकडून ही कारवाई करण्यात आली.

सीबीआयच्या पथकाने आज सकाळी ६ वाजता दरभंगा येथील भोला यादव यांच्या घरावर छापा टाकला. माजी आमदारांच्या गंज भैरोपट्टी यांच्या निवासस्थानी सीबीआय पथक दाखल झाले आणि त्यांनी चौकशी करण्यास सुरुवात केली. दरम्यान, काही क्षणातच कार्यकर्त्यांसह ललित यादव यांना बोलावण्यात आले. त्यानंतर या पथकाने खोल्यांची झडती घेतली. मात्र तेथे काही आढळून आले नाही. सुमारे दोन तास चाललेल्या या छाप्यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्याने दोन प्रतींमध्ये एक पेपर तयार केला आहे. त्याची प्रत भोला यादव यांच्या कार्यकर्त्याला दिल्यानंतर हे पथक माघारी गेले. त्यामुळे सीबीआयने अचानक टाकलेल्या या छाप्याची माहितीही कोणालाही मिळालेली नाही. परंतु अधिकारी गेल्यानंतर मात्र ही माहिती वाऱ्यासारखी पसरली. मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणात भोला यादव हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे. त्यामुळे सीबीआयकडून यादव यांच्या पाटणामधील दोन ठिकाणांवर धाड टाकण्यात आली. यातील एक ठिकाण यादव यांच्या सीएचे असून दरभंगा येथील दोन ठिकाणी तपास उशिरापर्यंत सुरू होता. सीबीआयने 18 मे रोजी याप्रकरणी लालू यादव, राबडी देवी, मिसा भारती आणि इतरांविरोधात एफआयआर नोंदवला होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami