नवी दिल्ली – राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची प्रकृती नाजूक झाली. बुधवारी रात्री उशिरा त्यांना पाटण्याहून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांचे सुपुत्र तेजस्वी यादव यांनी सांगितले की, त्यांच्या आरोग्याची संपूर्ण तपासणी केली जाईल. त्यानंतर उपचार सुरू केले जातील. सद्यस्थितीत त्यांच्या शरीराची हालचाल बंद झाली आहे. औषधाच्या ओव्हरडोसमुळे प्रकृती बिघडली आहे.
तेजस्वींनी सांगितले की, पाय घसरुन पडल्यामुळे लालूंना 3 ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहे. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. दुसरीकडे, लालूंसाठी देशभरात प्रार्थना सुरू आहे. पाटण्याच्या मंदिर आणि मस्जिदींत त्यांच्यासाठी प्रार्थना केली जात आहे. छोटी मुलेही त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना करत आहेत. वडिलांना वेगवेगळी औषधी दिली जात आहे. आता ज्या समस्या आहेत, त्या दूर करण्यासाठी देण्यात येणार्या औषधींचा दुष्परिणाम हार्ट किंवा किडनीवर पडू नये यासाठी त्यांना एम्समध्ये आणण्यात आले आहे. येथे त्यांची संपूर्ण तपासणी केली जाईल.’