संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 15 August 2022

लोणावळ्यात संध्याकाळी ५ नंतर प्रशासनाकडून पर्यटनाला बंदी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – लोणावळ्यातील पर्यटनस्थळी सायंकाळी पाचनंतर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक कोंडी आणि दुर्घटना टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे लोणावळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांनी सांगितले. वर्षा विहाराच्या निमित्ताने हजारो पर्यटक भुशी धरण, लायन्स पॉईंट आणि टायगर पॉईंट इथे दाखल होतात. नुकतेच मुंबईतील एका पर्यटकाचा भुशी धरणात पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रवेशबंदीचा निर्णय घेतला आहे.

लोणावळ्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. भुशी धरण ओव्हर फ्लो झाले आहे. हिरवेगार परिसर, धबधबे, रिमझिम पाऊस याचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक लोणावळ्यात दाखल होतात. ही संख्या विकेंडला लाखोंच्या घरातदेखील जाते. यामुळे शहरात मोठी वाहतूककोंडी पाहायला मिळते. मागच्या रविवारी टायगर पॉईंट ते सहारा ब्रिज हे १० ते १२ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक कासवगतीने सुरू होती. त्यामुळे सायंकाळी पाचनंतर लोणावळा पोलिसांनी पर्यटकांना मज्जाव केला आहे. पर्यटकांनी अतिउत्साह दाखवून धोकादायक ठिकाणी जाऊ नये, स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांनी पर्यटकांना केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami