नवी दिल्ली : वझीर एक्स हे एक क्रिप्टो करन्सी एक्सचेंज असून याचा वापर भारतात क्रिप्टो व्यवहारांसाठी अनेकजण करतात. याच प्रसिध्द क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज वझीरएक्स चालवणाऱ्या झान्माई लॅबच्या संचालकांच्या ठीकाणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापा टाकला आहे. तसेच या कारवाईदरम्यान त्यांची 64.67 कोटी रुपये बँक बॅलन्स गोठवण्यात आले आहेत.अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत परकीय चलन विनिमय कायद्याच्या कथित उल्लंघनाच्या आरोपाखाली वझीरएक्सशी संबंधित दोन प्रकरणांची ईडी चौकशी करत असल्याची माहिती दिली होती.त्याच्या काही दिवसातच ही कारवाई करण्यात आली आहे.
प्रमुख क्रिप्टो एक्सचेंजेसपैकी एक असलेल्या वजीरएक्स च्या माध्यमातून सुमारे 2,790 कोटी रुपयांच्या कथित मनी लाँड्रिंगची चौकशी अंमलबजावणी संचालनालय करत आहे, राज्यसभेत ही माहिती देण्यात आली आहे. वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लेखी उत्तरात सांगितले की, ईडी क्रिप्टोकरन्सीशी संबंधित दोन प्रकरणांची या क्रिप्टो एक्स्चेंजविरुद्ध फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट एक्ट अंतर्गत चौकशी करत आहे.
वझीर एक्स हे भारतातील सर्वात मोठे क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज आहे. हे पीअर टू पीअर क्रिप्टो व्यवहार यावरून करता येतात. म्हणजेच, यावरून बिटकॉइन, इथरियम, रिपल, ट्रॉन, लाइटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये ट्रेड करता येते.