नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी कार्यकर्ते आणि कवी वरवरा राव यांना वैद्यकीय कारणास्तव दिलेला अंतरिम जामीनामध्ये मंगळवारी वाढ करण्यात आली आहे. न्यायाधीश यूएल ललीत, न्यायाधीश रविंद्र भट आणि सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने राव यांची याचिका 19 जुलैपासून नियमीत सुनावणीला घेतली आहे. राव यांनी वकिलाच्या माध्यमातून वैद्यकीय कारणासाठी कायमस्वरुपी जामीन मागितला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून ही केस लढणारे सॉलीसीटर जनरल तुषार मेहता यांनी वरवरा राव यांच्या जामीनाला विरोध करताना म्हटले की, राव यांचा जामीन स्थगित करावा. त्यांना पुन्हा एकदा नव्या प्रकरणातील सुनावणीसाठी कोर्टात उद्या आणि परवा हजर राहावे लागणार आहे.