संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 12 August 2022

वसईमध्ये दरड कोसळली! बिल्डरविरोधात गुन्हा दाखल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

वसई : मागील दोन दिवसांपासून वसई येथे मुसळधार पाऊस पडत होता. या पावसामुळे वसईच्या वाघरळ पाडा येथे दरड कोसळली. या घटनेनंतर बिल्डर आणि जमीन मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच तीन चाळ बिल्डरांविरोधात एमआरटीपीएअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.महाराष्ट्र नगररचना प्रांतिक अधिनियमन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी सकाळी वसई पूर्वेच्या वाघरळ पाडा येथील एका बचाळीवर दरड कोसळली होती. या दुर्घटनेत अमित सिंग त्यांची मुलगी रोशनी सिंग यांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर पालिकेने दिलेल्या तक्रारीनंतर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर चाळी मितवा रिॲल्टीच्या अजित सिंग यांनी बिल्डरने बांधली होती. त्यांनी ही जागा मेरी ग्रेशीअस या महिलेकडून विकत घेतली होती. या दोघांवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami