माद्रिद – ‘वाका वाका’ गर्ल पॉप सिंगर शकीरा अडचणीत सापडली आहे. १.४५ कोटी युरो म्हणजे सुमारे ११७ कोटींच्या कर चुकवेगिरीचा आरोप तिच्यावर आहे. त्यात ती दोषी ठरली तर तिला ८ वर्षे २ महिन्यांची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती कोलंबियाच्या सरकारी वकिलांनी दिली. तिला २.४ कोटी युरो दंड ठोकण्याची मागणी त्यांनी केली आहे. पनामा पेपर्समध्ये तिचे नाव आले होते.
पॉप सिंगर शकीराने कर चोरी केल्याचे २०१८ मध्ये पहिल्यांदा उघडकीस आले होते. २०१३ आणि २०१४ मधील आपल्या उत्पन्नावर तिने कर भरला नसल्याचे स्पेनच्या कर विभागाने म्हटले आहे. करचुकवेगिरी प्रकरणी त्यांनी तडजोडीचा पर्याय तिच्यासमोर ठेवला होता. परंतु तिने तो न स्वीकारता कायदेशीर तपासाचा मार्ग पत्करला. आपण निर्दोष आहोत. कायद्यावर आपला विश्वास आहे, असे शकीराने म्हटले होते. शकीराच्या विरोधात न्यायालयात ६ आरोप आहेत. बार्सोलिनाचा फुटबॉलपटू जेरार्ड पिके यांच्या सोबतचे ११ वर्षांचे संबंध तिने नुकतेच संपवले आहेत. त्यांना २ मुले आहेत. मात्र आता करचोरी प्रकरणी ती कायद्याच्या कचाट्यात अडकली आहे. त्यात तिला शिक्षा आणि दंड होण्याची शक्यता आहे.