संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 13 August 2022

वाधवान बंधूंना ८ दिवसांची सीबीआय कोठडी; विशेष न्यायालयाचा निर्णय

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – ३४ हजार कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने डीएचएफएलचे संचालक धीरज वाधवान आणि कपिल वाधवान यांना अटक केली आहे. दिल्लीतील विशेष सीबीआय न्यायालयाने वाधवान बंधूंना आठ दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावली आहे.

सीबीआयने मंगळवारी वाधवान बंधूंना न्यायालयात हजर केले होते. त्यांनी ३४ हजार कोटींचा डीएचएफएल बँक घोटाळा केला असून त्यांची चौकशी करणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद सीबीआयकडून यावेळी करण्यात आला. सीबीआयने त्यासाठी दहा दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायालयाने वाधवान बंधूंना आठ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. तसेच याप्रकरणी आधीच अटकेत असलेला आरोपी अजय रमेश याची कोठडी संपल्याने त्यालाही मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याला दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, कपिल वाधवान आणि धीरज वाधवान हे दोघे येस बँक घोटाळ्याच्या संबंधित आरोपाखाली आधीपासूनच तुरुंगात आहेत. आता पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून १,८८७ कोटी रुपयांचे अनुदान लाटण्यासाठी खोटी खाती तयार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आरोप असा आहे की, त्यांनी मुंबईतील बांद्रा येथे डीएचएफएलची एक खोटी शाखा उघडली आणि तिच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेची १४ हजार ०४६ कोटी रुपयांची खोटी कर्ज खाती तयार केली. ज्यांच्या नावाने खाती काढण्यात आली होती, त्या ग्राहकांनी आपले कर्ज आधीच भरले होते. या पकरणाचा तपास आता सुरू आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami