संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 17 August 2022

‘वारकऱ्यांच्या सर्व गाड्यांना टोलमाफी’ मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : कोरोनाच्या सावटानंतर दोन वर्षांनी पायी वारी करण्याचा योग आला असून वारीला येणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. वारकऱ्यांच्या सर्व गाड्यांना टोलमाफी करण्यात येण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. वारीला जाणाऱ्या सर्व भाविकांच्या गाड्यांना टोलमाफी दिली जाणार आहे. पंढरपूर हे लाखो भक्तांचे तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे तिथे स्वच्छतेचे नियोजन आणि इतर देवस्थानांप्रमाणे पंढरपूरचा कायापालट होण्यासाठी विकास आराखडा आखण्यात आला आहे. याशिवाय दिंडी मार्गावरील अतिक्रमणे हटविण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत.

महाराष्ट्रातूनच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेकजण आपली वाहने घेऊन वारीला जात असतात. अशा गाड्यांना टोल भरावा लागत असून परिणामी गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागत असतात. त्यामुळे वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. वारकऱ्यांच्या गाड्यांना स्टीकर लावणे बंधनकारक असून वारी खड्डेमुक्त होण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami