संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 09 August 2022

वा रं गड्या! मजुराच्या मुलाला जेईई मुख्य परीक्षेत ९९.९३ टक्के

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

भोपाळ – सोमवारी जाहीर झालेल्या जेईई मुख्य परीक्षेच्या निकालात तब्बल ९९.९३ टक्के गुण मिळवून मध्यप्रदेशच्या दीपक प्रजापतीने पहिल्याच प्रयत्नात आपले स्वप्न साकार केले. इंदौर शहरात राहणाऱ्या दीपकच्या यशाची सध्या देशभरात चर्चा आहे. वयाच्या सातव्या वर्षी ‘ढ’ वर्गात बसवण्यात आलेल्या या मजुराच्या मुलाने आपल्या मेहनतीच्या जोरावर सर्व टीकाकारांना चोख उत्तर दिले.

विशेष म्हणजे दीपक आजही सर्व प्रकारच्या सोशल मीडियापासून लांब आहे. ‘मला कंटाळा आला की मी बॅडमिंटन, फुटबॉल खेळतो’, असे तो सांगतो. शाळेत लहानपणी ‘अभ्यासात अत्यंत वाईट’, असे त्याच्या गुणपत्रिकेवर लिहून आले होते. मात्र अभ्यासात सातत्याने सुधारणा करून त्याने दहावीत तब्बल ९६ टक्के आणि बारावीत ९२.६ टक्के गुण मिळविले. दहावीनंतर त्याला समुपदेशकांनी करिअरचे चांगले पर्याय दाखवले. त्यावेळी ‘मला अभियांत्रिकीच्या संकल्पनेचे आकर्षण आहे, मी आयआयटी-कानपूरमध्ये संगणक विज्ञान अभियांत्रिकीचा अभ्यास करेन’, असे त्याने आपल्या पालकांना सांगितले आणि जेईईची तयारी करण्यासाठी इंदौरला जाण्याची तयारी दाखविली. मात्र घरची परिस्थिती बिकट असल्याने पैशांअभावी अकरावीपासून दीपकने घरीच जेईईची तयारी सुरू केली. त्याचे वडील राम प्रजापती मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दीपकची मेहनत पाहून त्याला उच्च शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी नातेवाइकांकडून आर्थिक मदत घेऊन त्याला इंदौरमधील खासगी कोचिंग संस्थेत पाठवले. इंदौरमध्ये ९ महिने शिक्षण घेतल्यानंतर दीपकने जेईई मुख्य परीक्षेत ९९.९३ टक्के गुण मिळवले. दरम्यान, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही दीपकच्या यशाबद्दल त्याचे अभिनंदन केले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami