मुंबई – एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तार आणि विधानसभा अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपाकडून राहुल नार्वेकर यांच्या नावावार शिक्कामोर्तब झाला असून त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नव्या राज्य सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी ३ आणि ४ जुलै म्हणजेच येत्या रविवार आणि सोमवारी अधिवेशन बोलावले आहे. याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडदेखील होणार आहे. याच निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत शनिवारपर्यंत आहे. रविवारी अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल.
दरम्यान, या पदासाठी भाजपाकडून राधाकृष्ण विखे पाटील आणि शिंदे गटाकडून दीपक केसरकर यांचे नाव चर्चेत होते पण भाजपाने ऐनवेळी नार्वेकरांना उमेदवारी दिली आहे.