संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 16 August 2022

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- येत्या 18 जुलैपासून होत असलेले विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संसदीय कार्य विभागाने कळविल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून महाराष्ट्र विधिमंडळाने अधिकृत पत्रक काढून यासंदर्भातील माहिती दिली आहे.
विधिमंडळाने प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख 2022 च्या प्रथम सत्राच्या शेवटच्या दिवशी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार 18 जुलै 2022 पासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार होते. पण संसदीय कार्य विभागाच्या सूचनेनूसार हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. पण अधिवेशनाची तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नसून संसदीय कार्य विभागाने कळवल्यानंतर पुढची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami