विरारच्या मोरेश्वर सोसायटीतील मीटर बॉक्सला भीषण आग

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

विरार- विरार पश्चिमेच्या मोरेश्वर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील मीटर बॉक्समध्ये अचानक आग लागल्याची घटना आज सकाळी साडे आठच्या सुमारास घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची अंदाज वर्तवला जात आहे.

विरार पश्चिमेमध्ये मोरेश्वर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असून या सोसायटीतील मीटर बॉक्समध्ये आज सकाळी अचानक आग लागली. त्यामुळे सोसायटीतील राहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.या घटनेची माहिती मिळताच वसई-विरार महापालिका अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली आणि आगीवर नियंत्रणळविण्यात यश मिळवले. मात्र सोसायटीतील सर्व मीटर जळून खाक झाले सध्या इमारतीचा वीज पुरवठा खंडित केला होता.

Close Bitnami banner
Bitnami