अकोला – राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचा वाहनताफा शेतकर्यांनी अडवल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. शेतकरी नेते दशरथ सावंत यांना पोलिसांनी अजित पवार यांची भेट देण्यास नाकारले. त्यामुळे शेतकरी विकास मंडळाचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यांनी अकोला तालुक्यात अजित पवार यांचा ताफा अडवला. यावेळी घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत कार्यकर्त्यांना पांगवल असून दशरथ सावंत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अजित पवार अकोला तालुक्यात ऊस उत्पादकांच्या मेळाव्यात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी आले होते. या निवडणुकीत माजी मंत्री मधुकर पिचड, त्यांचे पुत्र वैभव पिचड यांच्या विरोधात सिताराम गायकर यांनी रणशिंग फुंकले आहे. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करणार्या सिताराम गायकर आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे धोतर फेडण्याचे वक्तव्य अजित पवारांनी केले होते. त्यामुळे पवार यांनी सीताराम गायकर यांचा प्रचार करू नये,अशी मागणी शेतकर्यांकडून
करण्यात आली.