संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 12 August 2022

वैतरणा धरण ओव्हर फ्लो; मुंबईकरांची चिंता मिटली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नाशिक – मुंबईसह राज्यात मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस पडल्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. अख्ख्या मुंबईची तहान भागवणारे जिल्ह्यातील वैतरणा धरण 80 टक्के भरले असून आज धरणातून 610 क्युसेस पाणी सोडण्यात आले. जिल्ह्यात या आठवड्यातही पुन्हा संततधार सुरू असल्याने गंगापूर, दारणा, पालखेड, गिरणा यांसह प्रमुख नद्या भर-भरून वाहू लागल्या आहेत.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे मध्य वैतरणा धरण काल ओव्हरफ्लो झाले. यापूर्वी मोडक सागर, तानसा आणि तुळशी धरणही ओव्हर फ्लो झाले आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या सात धरणांपैकी चार धरणे ओव्हरफ्लो झाल्याने मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मुंबईला दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. तर वर्षाला मुंबईला पिण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या जलाशयांत १२ लाख ५४ हजार ३७७ दशलक्ष पाणी जमा झाले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami