संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 14 August 2022

शनिवार पेठेत ज्येष्ठ महिलेची फसवणूक; ४३ हजारांचे दागिने लंपास

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – शनिवार पेठेत हातचलाखीने एका ज्येष्ठ महिलेकडील सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. दोन चोरट्यांनी या महिलेचे तब्बल ४३ हजार रुपयांचे दागिने लंपास केले. याबाबत महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, संबंधित महिला शनिवार पेठेतील एका सोसायटीत राहायला आहेत. दुपारी एकच्या सुमारास त्या सोसायटीच्या तळमजल्यावर थांबल्या होत्या. त्यावेळी दोन चोरटे सोसायटीच्या आवारात शिरले. ज्येष्ठ महिलांना बाराशे रुपयांच्या साडीचे वाटप करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी तुमच्याकडील दागिने काढून ठेवा आणि आमच्या मागोमाग या, असे चोरट्यांनी त्यांना म्हटले. त्यानंतर ज्येष्ठ महिलेने आपल्या अंगावरील सोन्याचे दागिने एका पिशवीत ठेवले. त्यावेळी चोरट्यांनी हातचलाखीने पिशवीतून ४३ हजारांचे दागिने काढून घेतले. ते दागिने घेऊन पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. आता याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami