दिल्ली- कोरोना परिस्थितीची आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी देशातील राज्य आरोग्य मंत्र्यांशी ऑनलाईन संवाद साधला. राज्यांनी शाळेत जाणार्या मुलांचे लस वाढवा. तसेच कोरोनाचा बूस्टर डोस ज्येष्ठांना मिळेल याकडे लक्ष द्यावे, असा सूचना मांडविया यांनी राज्यांना केल्या.
देशातील शाळा सुरु झाल्या आहेत. त्यातच देशात कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आज देशभरातील राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. मांडवियांनी राज्यांच्या समस्या जाऊन घेतल्या. तसेच शाळकरी मुलांचे कोरोना लसीकरण वाढवण्याची सूचना केंद्रीय आरोग्यमंत्री मांडविया यांनी राज्यांना केली आहे.