संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 13 August 2022

शिंदेंची नेतेपदावरून हकालपट्टी कायदेशीर लढू! केसरकरांचा इशारा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेतेपदावरून हकालपट्टी केली. तसे पत्र उद्धव ठाकरेंनी शिंदे पाठवले आहे. या हकालपट्टीविरोधात कायदेशीर लढाई लढू, असा इशारा शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकरांने दिला.

शिदेंना दिलेल्या पत्रात उद्धव ठाकरेंनी लिहिले की, तुम्ही पक्षविरोधी कारवाया करत आहात आणि स्वेच्छेने शिवसेनेचे सदस्यत्वही सोडले आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून माझ्याकडे असलेल्या अधिकारांचा वापर करून मी तुम्हाला पक्ष संघटनेतील शिवसेना नेते पदावरून दूर करत आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. त्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर म्हणाले की, नेतेपदावरून हटवल्याचे पत्र एकनाथ शिंदेंना मिळाले आहे. त्यांचे उत्तर आम्ही देणार आहेत. त्यांनी याबाबतचा निर्णय बदला नाही तर आम्ही कायदेशीर लढाई लढू,

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami