संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 18 August 2022

शिंदे म्हणतात, हिंदुत्वाशिवाय विचार नाही; राऊत म्हणतात, ‘वोही ‘गुरू’…’गुरूर’ भी वोही!

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – बंड केल्यापासून आपण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी एकनिष्ठ आहोत, अशी भूमिका शिंदे गट वारंवार घेत आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतानाही बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेतले होते. आज गुरुपौर्णिमेनिमित्तही त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे आपल्या गुरुस्थानी असल्याचे म्हटले. तर, दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सोशल मीडियावरून बाळासाहेब ठाकरेंचा फोटो शेअर केला.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपासोबत यावे, अशी भूमिका मांडली होती. हिंदुत्वाच्या मुद्यावर आम्ही महाविकास आघाडीसोबत राहू शकत नाही, असे त्यांनी म्हटले होते. आज गुरुपौर्णिमेनिमित्त शिंदेंनी त्यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. एक ट्विट करून त्यांनी आपली बाजू मांडली. मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटले, ‘बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही…गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन…’ यासह त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटोही शेअर केला आहे. तर, त्यांच्यापाठोपाठ संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरेंसोबतचा एक जुना फोटो शेअर केला आणि त्यावर ‘वोही ‘गुरू’…’गुरूर’ भी वोही! जय महाराष्ट्र!!’, असे लिहिले. या दोन्ही ट्विटबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

दरम्यान, शिवसेनेशी बंड करून भाजपाच्या सहकार्याने एकनाथ शिंदे यांनी राज्यात सत्ता स्थापन केली आहे. तर शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. याबाबत न्यायालयाच्या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami