संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 09 August 2022

शिमल्यामध्ये बस दरीत कोसळून 20 जण जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

शिमला-   शिमल्याच्या हिरा नगरमध्ये सरकारी एचआरटीसी बस दरीत कोसळून 20 जण जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली. या बसमध्ये सुमारे २५ प्रवासी होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनाची टीम घटनास्थळी पोहोचली. या जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलवले आले.

ही बस कांगडा येथील नगरोटा येथून शिमलाकडे येत होती. त्यावेळी ही बस हिरा नगरमध्ये पोहोचताच अचानक दरीत कोसळली. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले आणि दरीत मोठ्या प्रमाणात जंगल असल्याने बचावकार्यात अडथळे आले. जखमीना दरीतून बाहेर काढण्यात आले. जखमी झालेल्यांना उपचारासाठी शिमला येथील आयजीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami