संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 09 August 2022

शिर्डीतील साईबाबांच्या चरणी ३ दिवसांत ५ कोटींचे दान

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

शिर्डी – साईबाबांच्या शिर्डीत पार पडलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवादरम्यान दर्शनासाठी आलेल्या लाखो भाविकांनी साईचरणी कोट्यवधींचे दान दिले. तीन दिवसांत एकूण ५ कोटी १२ लाख रुपयांचे दान बाबांच्या झोळीत अर्पण केले.

दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधानंतर यावर्षी साईभक्तांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमा उत्सव पार पडला. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात तीन लाखांपेक्षा जास्त भाविकांनी साईदर्शनाला हजेरी लावली. या दान पेटीत २ कोटी १७ लाख देणगी, कांऊटरवर १ कोटी ५९ लाख, ऑनलाईन डोनेशनच्या माध्यमातून १ कोटी ३६ लाख, परकीय चलन १९ लाख, २२ लाखांचे सोने, तर ३ लाख रुपयांची चांदी असे एकूण ५ कोटी १२ लाखांचे भरभरून दान भक्तांनी अर्पण केले आहे. कोरोना काळात शिर्डीच्या साईमंदिरासह व्यवसायिकांची आर्थिक स्थिती बिकट झाली होती. आता मात्र भक्त आणि दान वाढत असल्याने शिर्डीची आर्थिक घडी पुन्हा बसताना दिसत आहे. आलेल्या दानातून साईसंस्थान भाविकांसाठी सुविधा, रुग्णसेवा आणि शिक्षणासाठी खर्च करत असते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami