संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 12 August 2022

शिवसेना आमदारांनतर आता खासदारही फुटीच्या तयारीत!

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- शिवसेनेतील आमदार फुटून बंडखोर शिंदे गटात सामील झाल्यानंतर आता शिवसेना खासदारही बंडखोरीच्या दिशेने जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.गेल्या काही दिवसांपासून अनेक खासदार नाराज आहेत. त्यांच्याच दबावामुळे राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेनेला उमेदवाराला पाठींबा देण्याचा निर्णयही बदलावा लागला. आता खासदारांच्या नाराजीचा स्फोट कधी होणार याबद्दलही चर्चा सुरु आहेत. आज एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या एका बैठकीला शिवसेनेचे १४ खासदार हजर होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीत शिवसेना कार्यकारिणी निवड आणि रामदास कदम आणि अडसूळ यांना पुन्हा शिवसेनेचे नेते न्म्हणून घेण्याबाबत चर्चा झाल्याचे कळते.शिवसेनेच्या सर्वोच्च न्यायालयातल्या लढ्याबद्दल शिंदे गटाची ही बैठक पार पडत आहे. २० जुलैला सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेचं अस्तित्व ठरणार आहे. त्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे कळते. तसेच आजपासून संसदेचं अधिवेशन सुरु झाले आहे. त्याचनिमित्तानं शिवसेना खासदारांच्या बंडाच्या शक्यतांनी पुन्हा जोर धरला आहे. महाराष्ट्राप्रमाणे दिल्लीत या बंडामुळे कुठलं सत्तांतर तर होणार नाहीय. पण अनेक महत्वाच्या विषयांवर हे खासदार भाजपला साथ देण्याची शक्यता आहे.लोकसभेत शिवसेनेचे 19 तर राज्यसभेत 3 असे एकूण 22 खासदार आहेत. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु झालंय. त्यामुळे पुढच्या एक दोन दिवसांतच खासदारांबाबत मोठा निर्णय होतो का हे पाहावं लागेल.दरम्यान, मुख्याम्नात्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस उद्या भाजपा श्रेष्ठींशी भेट घेणार असल्याचे कळते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami